पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारतीय जवानांचे चोख उत्तर

 पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार

Updated: Oct 9, 2020, 11:58 PM IST
पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारतीय जवानांचे चोख उत्तर

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर 3 ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने जोरदार गोळीबार आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील जोरदार प्रत्यूत्तर दिलं.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, "आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यातील शहापूर, किरणी आणि कसबा सेक्टरमध्ये गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केले."

1 ऑक्टोबर रोजी, पुंछ जिल्ह्यातील कृष्णघाटी भागात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सैन्याचा एक जवान शहीद झाला होता. तर दुसरा जखमी झाला. 5 सप्टेंबर रोजी राजौरीच्या सुंदरबानी सेक्टरमध्ये युद्धबंदीच्या उल्लंघनात लष्करी अधिकारी शहीद झाले आणि दोन लष्करी कर्मचारी जखमी झाले होते. 2 सप्टेंबर रोजी, राजौरीच्या केरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एका जेसीओचा मृत्यू झाला होता.