मुंबई: असं म्हणतात 16 वर्ष धोक्याचं कारण त्या वयात नुकतीच शाळा संपून कॉलेज सुरू होतं मात्र पुढची दोन वर्ष झपझप जातात आणि 18 व्या वर्षी आपल्याला अनेक सल्ले देण्याचा दिनक्रम सुरू होतो. अगदी मित्र-मैत्रिणींपासून ते नातलगांपर्यंत जो तो उपदेशाचे डोस किंवा सल्ले देण्याच्या मागे पडलेला असतो. मुलींना वयाच्या 18 वं वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला निर्णय घेण्याचा आणि मतदानाचा अधिकारही मिळतो. यावेळीच नेमकं तिला बिनकामाचे 4 सल्ले दिले जातात.
अनेकजणांचं असं मत असतं की शाळेतील मित्र-मैत्रीणीच हे कायमस्वरुपी राहतात. कॉलेजमधील मित्र परिवार हा कायमस्वरुपी कधीच टिकत नाही. त्यामुळे तसे मित्र-मैत्रीणी बनू शकत नाहीत. यामागचं कारण म्हणजे युवा अवस्थेमध्ये आपल्या भविष्याची चिंता प्रत्येकाला असते. त्यामुळे स्पर्धेत पुढे राहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीनं प्रयत्न करत असतो. त्यामध्ये हवेदावे होत असतात. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कॉलेजमध्ये चांगले मित्र-मैत्रिणी मिळू शकणार नाहीत.
पार्टनर, बेस्टफ्रेंण्ड किंवा बॉयफ्रेंडसोबत भांडण झालं असेल तर आपल्याला एक सल्ला दिला जातो की जेवू नको खाऊ नको म्हणजे समोरचा शांत होऊन तुझ्याशी बोलायला येईल. त्यामुळे रागात खाणं-पिणं सोडून देणं योग्य असतं हा बिनकामाचा सल्ला देऊ नका. कारण समस्यांचं समाधान खाणं-पिणं सोडून होत नाही. तर संवाद साधण्यातून होत असतं. तुम्ही समजुदारपणा दाखवायला हवा त्यातून ही समस्या सुटू शकते.
काही नाती टिकवण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावी लागत असते. प्रेम असो किंवा लग्न थोड्या काळानंतर एकमेकांसोबत समजुदारीनं वागण्यासाठी आणि तोच ताजेपणा टिकवण्यासाठी दोघांनाही खूप मेहनत घ्यावी लागते. हे नातं जर आपण टिकवलं नाही तर कलह होतात त्यातून मनस्ताप वाढतात. प्रेमासाठी कोणती मेहनत घ्यावी लागते असे सल्ले बऱ्याचदा दिले जातात मात्र हा सल्ला खूपच चुकीचा आहे. प्रत्येक नातं टिकवण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते.
या वयात एकमेकांकडे आकर्षित होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तुम्ही जर तुमच्या पार्टनरकडे लक्ष दिलं नाहीत तर तो तुम्हा धोका देऊ शकतो. कारण या वयात अटेन्शन खूप हवं असतं. हट्ट पूर्ण करावे असं वाटत असतं. तू पार्टनरचं मन दुखावू नको नाहीतर असं होईल असे सल्ले दिले जातात. त्यामध्ये बऱ्याचदा अविचारही असतो. ते पूर्ण नाही झाले की सहाजिकच पार्टनरचं मन दुखावलं जात नाही म्हणून तो दुसरा पार्टनर शोधू लागतो. मात्र नात्यामध्ये समजुदारपणा असणं फार आवश्यक आहे. तुम्हाला स्पेसही द्यायची आहे आणि नातंही जपायचं आहे. त्यामुळे समतोल राखणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर ब्रेकअप होण्याची शक्यता वाढत जाते.
वयाच्या 18 व्या वर्षी जर तुम्हाला कोणी असे सल्ले दिले तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही असे बिनकामी सल्ले द्यायला जाऊ नका. कारण यातून नुकसान होण्याची शक्यता असते. काही वेळा कदाचित तुमचीच सांगण्याची ऊर्जा देखील वाया जाऊ शकते.