मुंबई : देशात दिवाळीनंतरही अनेक बँका विविध श्रेणींमध्ये कर्ज ऑफर करीत आहेत. सवलतीच्या दरात मिळाणाऱ्या या कर्जांमध्ये सणासुदीच्या काळातील दर आणि प्रक्रिया शुल्क माफी यांचा समावेश आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया पाच वर्षांच्या कालावधीसह 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी 8.9 टक्के शुल्क आकारते. समान मासिक हप्ते (EMI) रु. 10,355 पर्यंत चालतील. सेंट्रल बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) देखील समान दर देतात.
इंडियन बँक दुसऱ्या क्रमांकाचे स्वस्त व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देते. त्यावर 9.05 टक्के व्याज आकारले जाते, EMI 10,391 रुपये आहे.
सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत बँक ऑफ महाराष्ट्रचाही क्रमांक लागतो. वयक्तिक कर्जावर वार्षिक 9.45 टक्के व्याजदर आकारला जातो. पाच वर्षांच्या कालावधीसह 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी तुमचा EMI 10,489 रुपये असेल.
पंजाब आणि सिंध बँक आणि IDBI बँक त्यांच्या वैयक्तिक कर्जावर 9.5 टक्के दर आकरतात. तुम्ही या बँकांकडून पाच वर्षांच्या कालावधीसह 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास, तुम्हाला दरमहा 10,501 रुपयांची ईएमआय द्यावा लागेल.
देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वयक्तिक कर्ज सवलतींमध्ये प्रक्रिया शुल्क माफीचा समावेश आहे. बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 9.6 टक्के आहे, ज्याचा EMI 10,525 रुपये आहे.