Petrol-Diesel Price: एका महिन्यात एवढ्या रूपयांनी वाढले पेट्रोलचे दर

जाणून घ्या आजचे पेट्रोलचे दर 

Updated: Jun 28, 2021, 07:18 AM IST
Petrol-Diesel Price: एका महिन्यात एवढ्या रूपयांनी वाढले पेट्रोलचे दर  title=

मुंबई : सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. इंडियन ऑयल वेबसाईटच्या माध्यमातूम मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पेट्रोल डिझेलच्या कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. याआधी रविवारी पेट्रोलचे दर 35 पैशांनी वाढले होते. डिझेलच्या दरात 26 पैशांनी वाढ झाली होती.  पेट्रोल डिझेलच्या सतत वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक चणचण भासत आहे. 

4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर 
शहर                   आजचे दर        
दिल्ली                   98.46  
मुंबई                    104.56
कोलकाता              98.30
चेन्नई                     99.49

4 मेट्रो शहरातील डिझेलचे दर 
शहर                आजचे दर 
दिल्ली                88.90
मुंबई                  96.42
कोलकाता           91.75
चेन्नई                  93.46

दररोज ६ वाजता दर प्रसिद्ध
 दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

आपण दर या प्रकारे तपासू शकता
तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील माहिती होऊ शकते. इंडियन ऑईलचे ग्राहक आरएसपी 9224992249 वर लिहून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी लिहून 9223112222 वर माहिती पाठवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना एचपीप्राइसला लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.