Petrol Diesel Price : जाणून घ्या आजचे दर

पेट्रोलच्या किंमतीत १५ ते १७ पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीत १५ ते १९ पैशांनी वाढ झालीय.

Updated: Dec 3, 2020, 08:23 AM IST
Petrol Diesel Price : जाणून घ्या आजचे दर title=

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या (Petrol Price 3 December 2020 Update) किंमतीत आज २० नोव्हेंबरनंतर सलग ११ व्या दिवशी वाढ होताना दिसतेय. पेट्रोलच्या किंमतीत १५ ते १७ पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीत १५ ते १९ पैशांनी वाढ झालीय. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर १७ पैशांनी वाढले तर डिझेलचे दर १९ पैशांनी वाढले. दिल्लीमध्ये काल पेट्रोलचा दर ८२.४९ प्रति लीटर होता. जो आज वाढून ८२.६ रुपये प्रति लीटर झाला.

मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत १४ पैशांनी वाढली. ही किंमत ८९.१६ हून वाढून ८९.३३ रुपये प्रति लीटर झालीय. चेन्नईमध्ये काल ८५.४४ रुपये प्रति लीटर होते तर ८५.५९ रुपये प्रति लीटर झाले. 

याप्रकारे डिझेलच्या किंमतीत देखील वाढ झालीय. दिल्लीमध्ये डिझेलचा भाव ७२.६५ रुपये प्रति लीटर होते. जे आज ७२.८४ रुपये प्रति लीटर झालंय. मुंबईत डिझेलच्या ७९.४२ प्रति लीटरने विकलं जातंय. तर कालचा दर ७९.२२ रुपये प्रति लीटर होतं.

स्वत: पाहा पेट्रोल-डिझेलच्या किंमती 

पेट्रोल-डिझेलच्या किंमती तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकतात. इंडीयन ऑईल IOC तुम्हाला ही सुविधा देत. आपल्या मोबाईलमध्ये RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ नंबरवर पाठवा. तुमच्या मोबाईलवर तात्काळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती येतील. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो.  IOC तुम्हाला वेबसाईटवर ही माहिती देते.

सकाळी बदलतात किंमती

रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर बाबींशी जोडल्यानंतर किंमती जवळजवळ दुप्पट होतात.