सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी किती बदलले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या ताजे अपडेट

Petrol-Diesel Price: गाडी घेऊन घराबाहेर पडण्यापूर्वी आजच्या दिवशी पेट्रोल डिझलच्या किंमतीही तुम्हाला माहिती असायला हव्यात. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 1, 2024, 08:55 AM IST
सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी किती बदलले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या ताजे अपडेट title=
पेट्रोल डिझेलच्या किंमती

Petrol-Diesel Price: सप्टेंबर महिना सामान्य नागरिकांसाठी काही बदल घेऊन आलाय. ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर पडू शकतो. 1 सप्टेंबरपासून अनेक बॅंकांनी आपल्या एफडीचे दर बदललेयत, काही क्रेडीट कार्ड कंपन्यांनी नवे नियम आणलेयत, TRAI ने मोबाईल कंपन्यांना महत्वाचे निर्देश दिल आहेत. 1 सप्टेंबरपासून असे अनेक बदल तुम्हाला पहायला मिळतील. त्यात आजच्या दिवशी पेट्रोल डिझलच्या किंमतीही तुम्हाला माहिती असायला हव्यात. 

देशभरात दररोज सकाळप्रमाणे आजदेखील पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले. महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 सप्टेंबरला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणता बदल झालेला दिसला नाही. ऑइल मार्केटींग कंपन्या सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलच्या किंमती जारी करतात. 

दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 94.72 रुपये तर डिझेलची किंमत  87.62 रुपये प्रति लिटर आहे. नोएडामध्ये पेट्रोलची किंमत  94.83 रुपये तर डिझेलची किंमत 87.96 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 104.95 रुपये तर डिझेलची किंमत 91.76 रुपये प्रतिलीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत       100.75 रुपये प्रति लीटर तर डीझेलची किंमत 92.34 रुपये प्रति लीटर आहे. 

गुरुग्राममध्ये पेट्रोलची किंमत 95.19 रुपये तर डिझेलची किंमत 88.05 रुपये प्रति लीटर आहे.  बेंगलुरुमध्ये पेट्रोलची किंमत     102.86 रुपये तर डिझेलची किंमत 88.94 रुपये प्रति लीटर आहे.  चंडीगढमध्ये पेट्रोलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर  82.40 तर डीझेल प्रति लीटर आहे.  पटनामध्ये पेट्रोलची किंमत  105.18 रुपये तर डिझेलची किंमत 92.04 रुपये प्रति लीटर इतकी आहे. 

जयपुरमध्ये पेट्रोलची किंमत 104.88 रुपये तर डिझेलची किंमत  90.36 रुपये प्रति लीटर आहे.   लखनऊमध्ये पेट्रोलची किंमत   94.56 रुपये तर डिझेलची किंमत 87.76 रुपये प्रति लीटर आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलची किंमत 107.41 रुपये तर डिझेलच्या किंमत  95.65 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 103.44 रुपये तर डिझेलची किंमत 89.97 रुपये प्रति लीटर इतकी आहे.

सर्व शहरात पेट्रोल-डिझेलचे दर आजही सारखेच आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल मार्च महिन्यात झालाय.

घरबसल्या पाहा पेट्रोल डिझेलचे दर 

आता तुम्ही घरबसल्या एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलचे दर माहिती करुन घेऊ शकता. तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर आरएसपी आणि पुढे आपल्या शहराचा कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवा. बीपीसीएल यूजर आरएसपी आणि शहराचा कोड लिहून 9223112222 या नंबरवर पाठवा. यानंतर तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून सर्व माहिती मिळू शकेल. एचपीसीएल ग्राहक HP Price लिहून 9222201122 वर पाठवायचे आहेत.