Petrol-Diesel चे दर किती वाढले? झटपट चेक करा तुमच्या शहरांतील दर

सरकारी तेल कंपन्यांकडून आज (25 ऑगस्ट) सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जारी करण्यात आले. मात्र आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात....

Updated: Aug 25, 2022, 09:01 AM IST
Petrol-Diesel चे दर किती वाढले? झटपट चेक करा तुमच्या शहरांतील दर  title=

Petrol-Diesel Price : सरकारी तेल कंपन्यांकडून आज (25 ऑगस्ट) सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जारी करण्यात आले. मात्र आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची दरवाढ झालेली नाही.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर  मुंबईत आज पेट्रोल 106.31 रुपये, तर डिझेल 94.27 रुपयांना मिळत आहे.  (Petrol-Diesel Price today 25 august 2022 ) 

इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (प्रति लिटरवर)

- बेंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर 101.94 रु. डिझेल 87.89 रुपयांना उपलब्ध 
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रु. डिझेल 92.76 रुपयांना  उपलब्ध 
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रु. डिझेल 94.24 रुपयांना उपलब्ध 
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रु. डिझेल 93.72 रुपयांना उपलब्ध आहे.
- अजमेरमध्ये पेट्रोल 108.43 रुपये आणि डिझेल 93.67 रुपये आहे.
- भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपयांना विकले जात आहे.

दर SMS द्वारे तपासा : राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.