नवी दिल्ली : कोरोना काळात ज्यांनी नोकरी गमावली अशा कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात केंद्र सरकार एम्पलॉयरच्या वाट्याची रक्कम जमा करणार आहे, ज्या कर्मचाऱ्यांना नंतर छोट्या स्तरावर कामासाठी बोलवण्यात आलं. 2022 पर्यंत सरकार ही रक्कम जमा करणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांना कोरोना काळात नोकरी गमवावी लागली होती.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकार 2022 पर्यंत अशा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यांमध्ये त्यांचा आणि नियोक्ताचा वाटा भरेल, ज्यांना नोकरी गमावल्यानंतर औपचारिक क्षेत्रात छोट्या श्रेणीतील काम मिळाले आहे. हा लाभ फक्त त्या नियोक्त्यांना दिला जाईल जे EPFO अंतर्गत नोंदणीकृत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारन यांनी शनिवारी ही माहिती दिली.
सीतारामन पुढे म्हणाल्या की, जर जिल्ह्यात अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे 25,000 हून अधिक स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळ ठिकाणी परतले तर त्यांना रोजगारासाठी 16 केंद्रीय योजनांचा लाभ मिळेल. अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, 2020 मध्ये, केंद्र सरकारने कोविडमुळे मनरेगाचे बजेट 60,000 कोटी रुपयांवरून सुमारे 1 लाख कोटी रुपये केले होते.