वर्ल्ड इकॉऩॉमिक फोरमसाठी पंतप्रधान मोदी रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वित्झर्लंडच्या डाव्होस शहरात होत असलेल्या वर्ल्ड इकॉऩॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी रवाना होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होणार परिषदेत सहभागी.

Updated: Jan 22, 2018, 09:49 AM IST
वर्ल्ड इकॉऩॉमिक फोरमसाठी पंतप्रधान मोदी रवाना title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वित्झर्लंडच्या डाव्होस शहरात होत असलेल्या वर्ल्ड इकॉऩॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी रवाना होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होणार परिषदेत सहभागी.

वीस वर्षातली ही पहिली वेळ

वर्ल्ड इक़ॉनोमिक फोरममध्ये भारतीय पंतप्रधानांनी सामील होण्याची वीस वर्षातली ही पहिली वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्तानं गेल्या साडे तीन वर्षात भारतात झालेल्या आर्थिक प्रगतीविषयी जगातील दिग्गज उद्योगपतींना माहिती देतील. वर्ल्ड इकॉनमिक फोरमच्या मुख्य सत्रात पंतप्रधान मोदी प्रमुख वक्ते असतील. त्याचप्रमाणे यानिमित्तानं डाव्होसमध्ये आलेल्या जगभरातल्या बड्या कंपन्यांनांच्या सीईओंसोबत पंतप्रधान विशेष चर्चा करणार आहेत. 

भारताची उडी

गेल्यावर्षी इज ऑफ डुईंग बिझनेसच्या यादीत भारतानं 42 स्थानांची उडी घेतलीय. त्यामुळे भारतातील भविष्यातील गुंतवणूक किती फायदेशीर ठरू शकते याविषयी सीईओंच्या बैठकीत मुद्दे मांडले जातील. 

मुख्यमंत्रीही होणार सहभागी

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४८व्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पहाटे स्वित्झर्लंडमधील डाव्होसला रवाना झाले. या परिषदेत मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग, तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातील वरिष्ठ अधिका-यांचे शिष्टमंडळ या परिषदेत विविध उद्योग समूहांशी महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांचा समावेश आहे.

उद्योगाबाबत होणार चर्चा

विविध उद्योगांसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देणे, राज्यातील पायाभूत सुविधांबाबतच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या उभारणीत सहकार्य घेण्याबाबतही प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न असून, पुढील महिन्यात होणा-या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८’ या उद्योग परिषदेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.