मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Pm Narednra Modi Birthday) आज (17 September) वाढदिवस आहे. पंतप्रधानांच्या या वाढदिवसानिमित्त देशाला अनोखं गिफ्ट मिळालंय.70 वर्षांपूर्वी भारतातून लूप्त झालेले चित्ते आज पुन्हा भारतात परतलेत. (pm narendra modi given birthday gift to indians african cheetahs travel 8 thousand kilometers from namibia to india)
हे आफ्रिकन चित्ते नामिबियातून 8 हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झालेत. भारतातून 1952 साली चित्ते नामशेष झाले होते. चित्त्यांना भारतात परत आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indiara Gandhi) यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) यासाठी परवानगी नाकारली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. त्यानंतर 2022 मध्ये प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे.
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येईल.या प्रोजेक्टसाठी भारत सरकारनं 90 कोटी रुपये खर्च केलेत.