कोरोना विरुद्धच्या लढाईत 'योग'चा सिंहाचा वाटा- पंतप्रधान मोदी

जगभरात आज सातवा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात योग करण्याचं महत्त्व सांगितलं.

Updated: Jun 21, 2021, 07:06 AM IST
कोरोना विरुद्धच्या लढाईत 'योग'चा सिंहाचा वाटा- पंतप्रधान मोदी title=

मुंबई: जगभरात आज सातवा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. या योग दिवसानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगचं महत्त्व सांगितलं. कोरोना विरुद्धच्या लढाईत योगचा महत्त्वाचा वाटा आहे. प्राणायाम, योग केल्यानं प्रतिकारक शक्ती वाढत असल्याचंही मोदी यांनी सांगितलं आहे. 

कोरोनामुळे सध्या ऑनलाइन शाळा सुरू आहेत. क्लास सुरू होण्याआधी अनेक शिक्षक मुलांकडून 15 मिनिटं योग करून घेतात त्यामुळे मुलांची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना विरूद्धच्या लढाईत हा खूप चांगला उपक्रम असल्यांचही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- कोरोना काळात जनतेला योगचं महत्त्व कळलं
- अनेक डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी योग केला.
- नकारात्मकतेकडून योग आपल्याला क्रिएटिव्हिचा रस्ता दाखवतं.
-रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग खूप महत्त्वाचा
-कोरोना काळात वैद्यकीय उपचारांसह योगही तितकाच महत्त्वाचा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत योग दिन संपन्न होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी देशवासीयांना मार्गदर्शन केलं. उत्तम आरोग्यासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगसाधनेचा अवलंब करण्यावर यंदा भर दिला जाणार आहे.