डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानल्यानंतर मोदी म्हणाले...

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत मानवजातील वाचवण्यासाठी शक्य ती सर्व मदत करेल.

Updated: Apr 9, 2020, 11:00 AM IST
डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानल्यानंतर मोदी म्हणाले... title=

नवी दिल्ली: अमेरिकेला हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine-HCQ) औषधाचा पुरवठा केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. अमेरिका ही मदत कधीही विसरणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. या ट्विटला आता नरेंद्र मोदी यांनी रिप्लाय दिला आहे. 

मोदींनी म्हटले आहे की, अशाप्रकारची अभूतपूर्व परिस्थिती मित्रांना आणखी जवळ आणत असते. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील ऋणानुबंध आणखी घट्ट झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत मानवजातील वाचवण्यासाठी शक्य ती सर्व मदत करेल. आपण ही लढाई एकत्रपणे जिंकू, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

इंडिया फर्स्ट; ट्रम्प यांच्या धमकीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

तत्पूर्वी अमेरिकेला hydroxychloroquine  या औषधाचा पुरवठा न केल्यास भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी भारताला दिला होता. यानंतर काही दिवसांतच भारताकडून अमेरिका, स्पेन आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांना हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine-HCQ)  औषधाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

अमेरिकेला मदत केली नाही तर भारताला परिणाम भोगावे लागतील- ट्रम्प

यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून भारताचे जाहीर आभार मानले होते. अशाप्रकारच्या असाधारण काळातच एकमेकांना मदत करण्याची गरज असते. अमेरिका भारताची ही मदत कधीही विसरणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्त्वाचे कौतुकही केले होते.