PM Modi Speech in Parliament LIVE Updates: : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (UNION Budget 2023 India) कामकाजाचा आज सातवा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेरो शायरी करत भाषणाला सुरुवात केली. या शेरो शायरीतूनच पंतप्रधान मोदी यांनी काँगेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचने नाव घेत राहुल गांधी चांगलेच भडकले. अदानी श्रीमंतांच्या यादीत दोन नंबरवर कसे पोहोचले? असा सवाल उपस्थित करत राहुल गांधी यांनी एक फोटो दाखवला होता. एका प्लेनमध्ये गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी (Gautam Adani, Narendra Modi) दिसत आहेत.
देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. नवीकरणीय ऊर्जेमध्ये भारत हा चौथा सर्वात मोठा देश बनला आहे. मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. खेळाडूंनी देखील जागतिक पातळीवर देशाचे नाव लौकिक वाढवला. भारताच्या प्रगतीचा डंका जगभरात वाजत आहे. मात्र, काही लोकांना देशाची प्रगती पहावत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ये कह कह कर हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं अशी शेरो शायरी करत मोदींनी विरोधकांना टार्गेट केले.