पोलिसच पर्यटकांचे कपडे घेऊन पळाले; अंतर्वस्रावरच... धबधब्यावरील धक्कादायक Video

Police Take Away Tourists Clothes Video: हा व्हिडीओ समोर आला असून अनेकांनी पोलिसांच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. नेमका हा प्रकार काय आहे आणि काय घडलं जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 14, 2024, 08:26 AM IST
पोलिसच पर्यटकांचे कपडे घेऊन पळाले; अंतर्वस्रावरच... धबधब्यावरील धक्कादायक Video
सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल झालाय

Police Take Away Tourists Clothes Video: जुन्या चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये नदीमध्ये स्नानासाठी गेलेल्या अभिनेत्रीचे कपडे माकड पळवतं आणि मग ते हिरो परत मिळवून देतो वगैरेसारखे सीन तुम्ही पाहिले असतील. मात्र कर्नाटकमध्ये पोलिसांनीच पर्यटकांचे कपडे घेऊन पळ काढल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कै झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नक्की घडलं काय?

लोकांनी पोलिसांनी घालून दिलेले नियम पाळावेत यासाठी कर्नाटक पोलिसांनी हटके उपाय केला आहे. पोलिसांच्या सूचनांचं पालन न करता पावसाळ्यामध्ये स्वत:चा जीव धोक्यात टाकून धबधब्यांखाली स्थानासाठी गेलेल्या पर्यटकांना पोलिसांनी धडा शिकवला आहे. पर्यटक धबधब्याखाली अंघोळ करत असानाच अचानक तिथे पोलीस आले. सामान्यपणे पोलीस पर्यंटकांना धबधब्यातून बाहेर काढून समज देतात. मात्र इथे उलटं घडलं. पोलीस आले आणि त्यांनी पर्यंटकांना काहीही बोलण्याऐवजी नदीच्या काठावर असलेले त्यांचे कपडे घेतले आणि निघून जाऊ लागले. यामुळे पर्यटकही संभ्रमात पडले. हा सारा प्रकार मुद्दीगीरी येथील चरमाडी धबधब्याजवळ घडला आहे. राज्य सरकारने पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाहचा अंदाज येत नसल्याचा संदर्भ देत धबधब्यांखाली अंघोळ करण्यावर बंदी घातली आहे.

अंतर्वस्रावरच पर्यटक करु लागले पाठलाग

राज्य सरकारने घातलेल्या बंदीचे आदेश झुगारुन काही पर्यटक धबधब्याखाली स्थानासाठी गेले. अंतर्वस्रांवर असलेल्या या पर्यटकांना पोलीस कपडे घेऊन जाऊ लागले असता तसेच बाहेर पडून पोलिसांचा पाठलाग करावा लागाला. हे पर्यटक कपडे घेऊन जाणाऱ्या चिकमंगळुरु पोलिसांकडे कपडे परत करण्याची विनंती करु लागले. मात्र पोलीस त्यांच्या गाडीमध्ये हे कपडे ठेऊन निघून जाण्याच्या तयारीत असताना पर्यटकांनी माफी मागत कपडे परत करण्याची विनंती केली. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

1)

2)

शेवटी काय घडलं?

पोलिसांनी या पर्यटकांकडून त्यांची चूक कबूल करुन घेतल्यानंतर पुन्हा कधीही असं करणार नाही असं वदवून घेतल्यानंतर कपडे परत केले. अनेकांनी पोलिसांच्या या अनोख्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. कर्नाटकच्या दक्षिणेकडील अनेक भागांमध्ये 14 आणि 15 जुलै रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More