नवी दिल्ली : आजपासून भाजप सरकारच्या अर्थसंकल्पीय सत्राला सुरूवात झाली आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. रामनाथ कोविंद यांचे हे पहिलेच अभिभाषण होते. त्यांनी त्यांच्या या भाषणातून सरकारच्या विविध कामांचा आढावा घेतला.
२०१८ हे वर्ष भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. ही आपली ड्युटी आहे की, आपण २०१९ मध्ये महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी करू. तोपर्यंत देशाला पूर्णपणे स्वच्छ करून त्यांना आपण श्रद्धांजली देऊ. आमच्या सरकारमुळे शेतक-यांची चिंता कमी होत आहे. देशभरात शौचालय निर्माण करण्याचे आंदोलन मोठ्या पातळींवर सुरू आहे.
- डाळ उत्पादनात ३८ टक्के वाढ झाली आहे.
- ९९ मोठ्या सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण केले.
- नीम कोटिंग मुळे यूरियामध्ये काळाबाजार कमी.
- शेतक-यांची आर्थिक असुरक्षितता कमी करण्यावर काम केले जात आहे.
- डेअरी सेक्टर मध्ये ११ हजार कोटी गुंतवणूकीचा प्रस्ताव...
- ई हेल्थ, ई एज्युकेशन महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
- ८० लाख ज्येष्ठ नागरिकांना अटल योजनेचा फायदा...
- ८२ टक्के गावांना रस्त्याने जोडले आहे.
- २०१९ पर्यंत प्रत्येक गावाला रस्त्याने जोडणार..
- १ लाख पेक्षा जास्त पंचायतींना ब्रॉडबॅंडने जोडले
- २०१९ पर्यंत प्रत्येक गावात वीजेचे लक्षे
- राष्ट्रीय मागास वर्ग आयोग बिल प्रलंबित आहे.
- दिव्यांग लोकांना नौक-या दिल्या आहेत.