बाबोsss! हाय सिक्युरिटी जेलमध्ये जाताना कैद्याने केला मोठा कांड! गिळले 5 मोबाईल्स अन्...

तिहार जेलमधील एका कैद्याने मोबाईल गिळल्याची धक्कादायक घटना समोर येतेय. या कैद्याने जेलमध्ये जाण्याआधी 5 मोबाईल्स गिळले होते. यातील दोन मोबाईल्स डॉक्टरांना यश आलं आहे. तर इतर मोबाईल्स या कैच्याच्या पोटात असल्याचं समजतंय. हे मोबाईल काढण्यासाठी आता डॉक्टरांना ओपन सर्जरी करावी लागणार आहे.  

Updated: Nov 14, 2022, 09:02 PM IST
बाबोsss! हाय सिक्युरिटी जेलमध्ये जाताना कैद्याने केला मोठा कांड! गिळले 5 मोबाईल्स अन्... title=

Prisoner gulped mobiles : जेलमध्ये अवैधरित्या गोष्टी नेण्याचा घटना आपण अनेकदा पाहतो. त्यावरील बातम्याही वाचतो. अशीच एक विचित्र घटना नुकतीच  समोर आली आहे. यामध्ये कडक सिक्युरिटीमध्ये असलेल्या एका कैद्याच्या पोटात 5 मोबाईल फोन्स गिळल्याची घटना समोर. ही घटना लक्षात येताच डॉक्टरांनी या कैद्याच्या पोटातून दोन मोबाईल बाहेर काढले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या कैद्याच्या पोटात अजूनही इतर मोबाईल्स असल्याचं  सांगितलं जातंय. हे मोबाईल काढण्यासाठी या कैद्याची इन्व्हेसिव्ह सर्जरी करावी लागणार आहे. जेलमद्ये जाण्याच्या आधी या कैद्याने मोबाईल गिळले होते. जेलमध्ये गेल्यावर त्याने हे मोबाईल काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये तो कैदी त्यामध्ये अपयशी ठरला.  

कुख्यात तिहार जेलमध्ये आहे हा कैदी

28 वर्षीय रमण सैनी नावाचा हा कैदी आहे. जून जुलै महिन्यांपासून हा तिहार जेलमध्ये कैद आहे. पोलिसांचा रेकॉर्ड पाहिला तर हा कैदी कुख्यात चोर असल्याचं समजतं. या कैद्याला कोर्टात हजर केल्यानंतर जेंव्हा तो परतला तेंव्हा मेटल डिटेक्टरमध्ये बीप वाजायला लागले. यानंतर पोलिसांना या कैद्यावरील संशय वाढला. या कैद्याच्या पोटात काहीतरी लपवलेलं असू शकतं, असा संशय पोलिसांना आला. सुरुवातीला या कैद्याला डीडीयू रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे त्याच्या पोटात मोबाईल आहेत हे समजू शकलं नाही. यानंतर कैद्याला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं. या कैद्याला जी बी पंत रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आलं. 1 सप्टेंबर रोजी रमण याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र त्या दिवशीही त्याच्या पोटात मोबाईल फोन आहेत हे समजू शकलं नाही. 

अजूनही पोटात आहेत मोबाईल फोन्स 

या कैद्याला पुन्हा एकदा तिहार जेलमधून जी बी पंत रुग्णालयात तपासणीसाठी आलं. रुग्णालयात नेऊन या कैद्याची एन्डोस्कोपी करण्यात आली. यावेळी दोन मोबाईल फोन्स पोटातून काढण्यात आले. हे दोन्ही फोन्स कैद्याच्या तोंडातून बाहेर कडण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या कैद्याची पुढील तपासणी करण्यात आली. कैद्याच्या पोटाची तपासणी केली असता या कैद्याच्या पोटात आणखी मोबाईल्स असल्याचं स्पष्ट झालं. मात्र डॉक्टरांना तेंव्हा ताबडतोब मोबाईल काढता आले नाही. हे मोबाईल्स काढण्यासाठी डॉक्टरांना आता इन्व्हेसिव्ह सर्जरी करावी लागणार आहे. 

फोन काढण्यासाठी करावी लागणार ओपन सर्जरी 

कैद्याच्या पोटातून मोबाईल काढण्यासाठी डॉक्टरांना आता नवीन सर्जरी करावी लागणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता सध्या या कैद्याच्या जीवाला धोका नसल्याचं समजतंय. पोटातील ऍसिड्समुळे हे मोबाईल्स दिवसेंदिवस खराब होत जातील असं सांगितलं जातंय.  

तस्करांकडून वापरली जाणारी पद्धत 

अशा पद्धतीने मोबाईल फोन किंवा ड्रग्स पोटातून घेऊन जाण्याची  ही पहिली वेळ नाही. तस्करांकडून या प्रकारच्या पद्धतीचा कायम वापर करण्यात येतो. अशा पद्धतीने पोटातून कोणत्याही गोष्टीची तस्करी करणे अतिशय धोकादायक ठरू शकतं. मोबाईल गिळण्यासाठी त्यांना विशेष आवरणात पॅक केलं जातं. थेट मोबाईल गिळल्यास पोटातील ऍसिड्समुळे मोबाईलला गंज लागू शकतो. अशात तस्कर आधी हे मोबाईल्स मेथिलिन ब्लू ने कव्हर करतात. हे एक विशेष पद्धतीचं मटेरियल असतं, जे लवकर खराब होत नाही. यानंतर मोबाईल कंडोम किंवा पॉलिथिनमध्ये टाकून गिळला जातो. 

कैद्याच्या बायकोची मागणी 

कैद्याच्या बायकोने कैद्याच्या पोटात अडकलेले इतर मोबाईल्स बाहेर काढण्याची मागणी केली आहे. आपल्या नवऱ्याच्या पोटात हा फोन ब्लास्ट होऊ शकतो आणि याने आपल्या नवऱ्याच्या जीवाला धोका असल्याचं सांगत तिने कैद्याच्या पोटातील मोबाईल काढण्याची मागणी केली आहे. तिच्या नवऱ्याने हे मोबाईल का गिळले हे तिला ठाऊक नाही. या दोघांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं आहे. हा कैदी पॅरोलवर बाहेर असताना त्यांचं लग्न झालेलं. जेलमधूनही हा आपल्या बायकोशी कायम बोलत होता. या दोघांची पहिली मुलाखतही जेलच्या व्हिजिटर रूममध्ये झाली होती. 

Prisoner of tihar jail gulped 5 mobiles 2 are still in his stomach