अमित शहा यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

 राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

Updated: Oct 9, 2017, 04:00 PM IST
अमित शहा यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांच्या कंपनीला १६ हजार पट नफा एका वर्षात कसा वाढला, असे प्रश्नचिन्ह उपस्थित करत पृथ्वीराज चव्हाण यांनी, अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

जय शहा यांची कंपनी ही शेल कंपनी तर नाही ना? असा सवाल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.