जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. तर, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.ॉ

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 3, 2017, 09:53 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद title=
Representative Image

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. तर, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.ॉ

पुलवामा जिल्ह्यातील सांबूरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली. त्यानंतर भारतीय सैन्याने त्या परिसराला घेरत शोध मोहीम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांसोबत भारतीय लष्कराची चकमक झाली.

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले. तर, सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

या परिसरात अद्याप दोन दहशतवादी लपल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भारतीय सैन्यातर्फे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता. तर, २९ ऑक्टोबर रोजी उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता.