सिद्धूच्या अडचणींत वाढ... मंत्रिपदंही जाणार?

भाजपला आयतं कोलित मिळालंय. सिद्धू यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी भाजपनं केलीय. 

Updated: Apr 13, 2018, 05:45 PM IST
सिद्धूच्या अडचणींत वाढ... मंत्रिपदंही जाणार? title=

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मत्री नवज्योजसिंग सिद्धू आपल्याच काँग्रेस सरकारमुळे मोठया अडचणीत आले आहेत. एका जुन्या खटल्यात दोषी ठरलेल्या सिद्धूला सुनावण्यात आलेली तीन वर्षांची शिक्षा योग्य असल्याची भूमिका पंजाब सरकारनं घेतली आहे. त्यामुळे सरकारमध्ये मंत्री असलेल्या सिद्धू यांच्या विरोधात सरकारनं भूमिका घेतल्यामुळे सिद्धू यांची मोठी अडचण झालीय. त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं पुढं आलंय. 

मात्र, यामुळं भाजपला आयतं कोलित मिळालंय. सिद्धू यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी भाजपनं केलीय. 

1998 मध्ये रस्त्यावर सिद्धूसोबत झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात सिद्धूला पंजाब हायकोर्टानं दोषी ठरवलं होतं. मात्र, त्याविरोधात सिद्धूनं सुप्रीम कोर्टात धाव घेत दोषमुक्त करण्याची याचिका दाखल केली होती.

मात्र, सिद्धूला सुनावलेली शिक्षा योग्य असल्याची भूमिका पंजाब सरकारनं सुप्रीम कोर्टात मांडली. त्यामुळं सिद्धू अडचणीत सापडलाय.