जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मलिक यांचे आव्हान राहुल गांधींनी स्विकारले

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल  मलिक यांचे आव्हान राहुल गांधी यांनी स्विकारले आहे.  

Updated: Aug 13, 2019, 03:29 PM IST
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मलिक यांचे आव्हान राहुल गांधींनी स्विकारले
Pic Courtesy: twitter

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आव्हान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्विकारले आहे. मलिक यांच्या वक्तव्याला राहुल गांधी यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. राहुल म्हणालेत, खरी स्वातंत्र्याची गरज आहे, विमानाची नाही. 

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक चांगलेच भडकलेत. राहुल गांधी यांच्यासाठी विमान पाठवतो. त्यांनी काश्मीरच्या खोऱ्यात यावे आणि इथली परिस्थिती पाहून मगच बोलावे, असे आव्हान सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना दिले होते. मलिक यांचे आव्हान राहुल यांनी स्विकारत याबाबत ट्विट केले आहे. आम्हाला विमानाची गरज नाही. परंतु कृपया आम्हाला तेथील लोकांना, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य देण्याची खात्री द्या.

राहुल गांधी यांनी शनिवारी काश्मीर खोऱ्यात हिंसाचार सुरू असल्याचे एका अहवालाचा हवाला देत म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत असल्याची टीकाही केली होती. राहुल गांधी यांच्या विधानावर जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक मात्र भडकले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन सत्यपाल मलिक यांच्यावर टीका केली.