वॉशिंग्टन : पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे असे वक्तव्य कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. ते सध्या अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारताच्या ताकदीबाबत तेथील विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. देशाच्या विकासासंदर्भात त्यांचे स्वतःचं असलेले व्हिजन विद्यार्थ्यांपुढे मांडले.
Mr.Modi has certain skills,he is a very good communicator,much better than me: Rahul Gandhi in #UCBerkeley
— ANI (@ANI) September 12, 2017
Core constituency of right wing leaders are those who cannot get a job: Rahul Gandhi in #UCBerkeley pic.twitter.com/aNZGTUa9IY
— ANI (@ANI) September 12, 2017
कॉंग्रेसच्या पराभवाबद्दल ते बोलत होते. २०१२ मध्ये काँग्रेस पक्षामध्ये अहंकार निर्माण झाला होता आणि पक्षानं जनतेशी संवाद कमी केला होता, ज्यामुळे लोकं दुरावली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधी यांनी सार्वजनिकरीत्या पहिल्यांदाच व्यक्त केले.