राहुल गांधींची वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. 

Updated: Aug 27, 2019, 11:28 PM IST
राहुल गांधींची वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस title=

वायनाड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. मात्र यावेळी त्यांनी आपण काही केरळचे मुख्यमंत्री नाही. ना केरळमध्ये आम्ही सत्तेत आहोत, ना केंद्रात, अशी हतबलता व्यक्त केली. त्याचवेळी राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बॅंकेचा राखीव निधी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देणार आहे. देशातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. रिझर्व्ह बँकेकडे असणाऱ्या अतिरिक्त रकमेतून सरकारने पैसे मागितले होते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने बिमल जालान यांच्या समितीच्या शिफारसी मंजूर केल्यात. त्यानुसार रिझर्व्ह बँक सरकारला १ लाख ७६ हजार कोटी देणार आहे. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करण्याआधी काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठांसोबत चर्चा करावी असा टोला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लगावलाय. आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय रिझर्व्ह बँकेकडून चोरी करण्यासारखा आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला सीतारमण यांनी उत्तर दिले आहे.