मी आरएसएस - मोदींचा आभारी आहे कारण... - राहुल गांधी

राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या जागेवर जाऊन त्यांची गळाभेट घेतली 

Updated: Jul 20, 2018, 02:45 PM IST
मी आरएसएस - मोदींचा आभारी आहे कारण... - राहुल गांधी title=

नवी दिल्ली : अविश्वास ठरावादरम्यान सदनाची कारवाई एकदा स्थगित करून पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर 'श्रीराम'ची नारेबाजी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले. यावेळी, राहुल गांधींनी उपहासात्मक पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर निशाणा साधला. 'कुणी म्हणेल पंतप्रधान मोदींबद्दल माझ्या मनात राग आहे... पण माझ्या मनात पंतप्रधान आणि संघाप्रती प्रेमच आहे. मी पंतप्रधान, भाजप आणि आरएसएसचा आभारी आहे... कारण त्यांनी मला 'काँग्रेस'चा आणि 'हिंदुस्थानी' असल्याचा अर्थ समजावला, असं राहुल गांधींनी संसदेत म्हटलंय. इतकंच नाही तर 'भाजपसाठी मी पप्पू असलो, माझ्याबद्दल राग असला तरी माझ्या मनात मात्र कुणासाठीही राग नाही', असं म्हणत सदनातच राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या जागेवर जाऊन त्यांची गळाभेट घेतली. 

मोदी आणि शाह सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. देशात दलित, आदिवासी, महिलांवर अन्याय होतोय मात्र पंतप्रधान मोदी एक चकार शब्द काढायला तयार नाहीत... देशात महिला सुरक्षित नाहीत... महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ... महिलांचं संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरतंय... लोकांच्या हत्या, मारहाणीच्या घटनांत वाढ झालीय... संविधान बदलण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही... असं म्हणत देशातील परिस्थितीही राहुल गांधींनी संसदेत बोलून दाखवली.