स्टाईल मारण्याच्या नादात रजनीकांत यांच्या डुप्लिकेटनं करुन घेतला अपमान, व्हिडीओ व्हायरल

कधी-कधी माणूस इतका भारावून जातो की, त्याचा स्वत: वर कंट्रोल राहात नाही.

Updated: Jul 7, 2021, 08:54 PM IST
स्टाईल मारण्याच्या नादात रजनीकांत यांच्या डुप्लिकेटनं करुन घेतला अपमान, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : एखाद्या फिल्मस्टार सारखा दिसणारा किंवा एखाद्या स्टार्सचा कोणीताही लूक लाईक व्यक्तीचे आपल्याला कौतुक वाटते. आपण त्यांचा व्हिडीओ कुतूहलाने पाहातो. आपल्याला त्याची अ‍ॅक्टींग मजेदार वाटते आणि मनोरंजन देखील करते. ही लोकं स्टार्सची इतकी हुबेहुब नकल करतात की, बहुतेकदा आपल्याला तोच स्टार समोर आला आहे असा भास होतो. परंतु हे देखील तेवढंच खरं आहे की, अशी नकल करताना कुणीही ओवर अ‍ॅक्टींग करु नये. कारणी ती त्यांना माहागात देखील पडू शकते.

कारण कधी-कधी माणूस इतका भारावून जातो की, त्याचा स्वत: वर कंट्रोल राहात नाही. ज्यामुळे त्यांना त्यांच्या कृत्यामुळे मान खाली घालण्याची वेळ येऊ शकते आणि लोकांसमोर त्याचं हस्य होऊ शकतो.

अशाच एका रजनीकांत सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. कारण दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत सारखा अभिनय करणे प्रत्येकालाच जमत नाही. कारण रजनीकांत होणं इतकं सोप नाही. कारण कोणतीही स्टाईल करताना त्यामागे रजनीतकांत यांचे अथक प्रयत्न असतात.

या रजनीकांत यांच्या सारख्या हूबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीने त्यांची स्टाईल आणि स्टंट करण्याचा प्रयत्न केला, जो फसला आणि हजारो लोकांसमोर स्वत:चं हस्य करुन घेतलं.

रजनीकांत यांचा डुप्लिकेट स्टेजवर पडला

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, कोणत्या तरी पार्टीत एक व्यक्ती सुपरस्टार रजनीकांतसारखे कपडे घालून आला होता. रजनीकांत यांच्या 'कबाली' या कल्पित चित्रपटाच्या व्यक्तिरेसारखा दिसणारा हा डुप्लीकेट माणूस स्टेजवर आला तेव्हा लोकांनी त्याला स्टेजवर पाहाताच कडाडून टाळ्या वाजवल्या आणि त्याचे स्वागत केलं.

परंतु नंतर याने जेव्हा रजनीकांत यांच्या सारखी स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो त्याला भलताच महागात पडला आणि त्याने स्वत:चं हस्य़ करुन घेतलं.

रजनीकांत यांच्या या डुप्लिकेट व्यक्तीने प्रथम खुर्चीला लाथ मारली, खुर्चीला लाथ मारताच ती खूर्ची तुटली आणि त्याच्यात त्याचा पाय अडकून हा व्यक्ती जमिनीवर पडला. ज्यानंतर लोकं त्याची ओवर अॅक्टींग पाहून स्वत:ला हसण्यापासून थांबवू शकले नाहीत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ जवळपास 50 हजार लोकांना आवडला आहे. काही यूझर्स या व्यक्तीचे पाय खेचण्यात मागे पडत नाहीत. कारण त्यांनी या व्हिडीओवर एकपेक्षा एक कमेंट्स केले आहे. त्यांपैकी एका यूझरने लिहिले की, हा तर स्वस्तातला रजनीकांत आहे.