रस्त्यावर क्रिकेट खेळणं किती धोकादायक ठरू शकतं, एकदा हा व्हिडीओ पाहाच

बऱ्याचदा आपण रस्त्यावर मजा म्हणून क्रिकेट खेळतो मात्र हा खेळ आपल्या जीवावर बेतू शकतो हे दाखवणारा व्हिडीओ 

Updated: Jul 23, 2021, 09:57 PM IST
रस्त्यावर क्रिकेट खेळणं किती धोकादायक ठरू शकतं, एकदा हा व्हिडीओ पाहाच

मुंबई: बऱ्यादचा मजा म्हणून अगदी मुलांपासून ते मोठ्यापर्यंत रिकामा रस्ता दिसला की क्रिकेटचा खेळ रंगतो. कधी सुट्टीच्या दिवशी तर कधी संध्याकाळी अनेकदा क्रिकेट खेळताना पाहिलं असेल. गल्लीतील क्रिकेट तर खूप प्रसिद्ध आणि आठवणीतले किस्से असतात. पण रस्त्यावर क्रिकेट खेळणं जीवघेणं ठरू शकतं याचा कधी विचार केला जातो का?

खेळण्यात मग्न असलेल्या तरुणासोबत असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. रस्त्यावर क्रिकेटचा खेळ रंगला होता. तरुणाने बॉल टोलवला आणि रन काढायला जाताना मागू वेगात असलेला बाईकस्वार या तरुणाला धडकला. दैव बलवत्तर म्हणून या तरुणाचा जीव वाचला. मात्र बाईकस्वार जोरात खाली कोसळला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by __jatt.life_(@__jatt.life___)

आतापर्यंत 3 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तर 20 लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये काही युझर्सनी बॅट्समन आणि बाईकस्वार दोघंही वेडे आहेत त्यामुळे हा प्रकार घडल्याचं म्हणतायत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यावर तुम्हालाही क्रिकेट खेळण्याची सवय असेल तर जरा जपूनच नाहीतर खेळण्याच्या धुंदीत जीव गमावण्यापेक्षा काळजी घेणं केव्हाही योग्य.