मुंबई : बँक ऑफ इंडिया (BOI) आणि पंजाब नॅशनल (PNB) बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी कारवाई केली. या दोन बँकांवर आरबीआयने एकूण 6 कोटींचा दंड ठोठावला आहे. (RBI slaps Rs 6 cr fine on Bank of India and PNB for contravention of norms)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) यांच्यावर कारवाई केली. त्यापैकी एक प्रकरण 'फसवणुकीचे वर्गीकरण आणि त्यासंदर्भात अहवाल देणे' या नियमांशी संबंधित आहे. बँक ऑफ इंडियावर 4 कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank of India (RBI) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 31 मार्च 2019 रोजी बँक ऑफ इंडियाच्या एलएसईसाठी वैधानिक तपासणी (Statutory Inspection ) केली गेली. खात्याने केलेली फसवणूक शोधण्यासाठी बॅंकेने एक आढावा घेतला आणि फसवणूक मॉनिटरिंग रिपोर्ट (FMR) सादर केला. आरबीआयने एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक स्थितीच्या संदर्भात तपासणी केली गेली. केंद्रीय बँकेने असे म्हटले आहे की जोखीम मूल्यांकन अहवालाच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, या प्रकरणांमध्ये निकषांचे पालन केले जात नाही.