नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरात त्याला आलेल्या नैराश्याची चर्चा सुरु आहे. सुशांतच्या नैराश्याच्या कारणांवर चर्चा सुरु आहे. पण देशात दरवर्षी होणाऱ्या आत्महत्यांचा आकडा पाहिला तर नैराश्य आणि आत्महत्या ही एक सामान्य समस्या नसून ती एखाद्या मोठ्या साथीच्या आजारापेक्षा कमी नसल्याचं लक्षात येतं. विशेष म्हणजे दरवर्षी होणाऱ्या लाखो आत्महत्यांची कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात होणाऱ्या एकूण आत्महत्यांपैकी ४० टक्के आत्महत्या या जवळच्या नात्यांमुळेच केल्या जातात. म्हणजे कुटुंब, विवाह आणि प्रेम यामध्ये निर्माण झालेल्या समस्या आणि वादामुळे ४० टक्के आत्महत्या होतात. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २९ टक्के लोक कौटुंबिक समस्यांतून आत्महत्या करतात. तर ५ टक्के लोक वैवाहिक जीवनात सुखी नसल्याने जीवन संपवतात. प्रेमसंबंधातील समस्यांमुळे साडेतीन टक्के लोक मृत्युला कवटाळतात.
याशिवाय १७ टक्के लोक आजाराला कंटाळून आत्महत्या करतात. २.८ टक्के लोक कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. तर ४ टक्के लोक व्यसन आणि नशेमुळे आत्महत्या करतात.
आत्महत्यांबाबतची आकडेवारी पाहिली तर ती केवढी मोठी समस्या आहे हे लक्षात येईल. याबाबतचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे
एकूणच नैराश्य आणि आत्महत्या ही जगभरातील समस्या असून या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी योग्य वेळी उपचार होणे गरजेचे आहे.