रिलायन्स कॅपिटल कर्मचाऱ्यांना देणार ३०० कोटी रूपयांचे शेअर

आर्थिक सेवा देणारी कंपनी रिलायन्स कॅपिटलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. रिलायन्सकडून विविध विभागातील निवडक कर्मचाऱ्यांना ३०० कोटी रूपयांचे शेअर्स दिले जणार आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 23, 2017, 08:54 PM IST
रिलायन्स कॅपिटल कर्मचाऱ्यांना देणार ३०० कोटी रूपयांचे शेअर  title=

नवी दिल्ली : आर्थिक सेवा देणारी कंपनी रिलायन्स कॅपिटलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. रिलायन्सकडून विविध विभागातील निवडक कर्मचाऱ्यांना ३०० कोटी रूपयांचे शेअर्स दिले जणार आहेत.

कंपनीकडून या निर्णयाची घोषणा बुधवारी करण्यात आली. ही घोषणा म्हणजे कंपनीच्या वृद्धी आणि फायद्यात सातत्याने योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचा एक भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रिलायन्स कॅपिटल रिवार्ड्स प्रोग्राम अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, हे शेअर्स रिलायन्स कमर्शिअल फाईनान्स, रिलायन्स निप्पन लाईफ एसेट मॅनेजमेंट, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स निप्पन लाईफ इश्योरन्स, रिलायन्स जनरल इश्योरन्स आणि रिलायन्स सिक्यूरीटीसोबतच रिलायन्स कॅपीटलच्या इतर विभागांतील निवडक ५०० कर्मचाऱ्यांना दिले जातील.

कंपनीने म्हटले आहे की, या योजनेअंतर्गत सुमारे ९,२१,००० शेअर्स दिले जातील. ज्यांची किंमत ३०० कोटी रूपये आहे. हा आकडा कंपनीच्या आर्थव्यवस्थेच्या १.६ टक्के इतका आहे.