Viral News : उन्हाळ्यात आपण अनेकदा हॉटेलमध्ये एकट्याने किंवा कुटुंबासह नाश्ता किंवा जेवणासाठी जातो. यामागचं एक कारण म्हणजे उन्हापासून आराम मिळवण्यासाठी कधी कधी हॉटेलच्या एसीची गारगार हवा खाण्याचाही असतो. पण असा प्लॅन बनवण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. कारण एसीची थंड हवा घेण्यासाठी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा विचार करत असाल आणि तिथे गेल्यावर तुम्हाला कळलं की एसीच बंद ठेवण्यात आला आहे तर.
सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये पंजाबी भाषेत एक ओळ लिहिली आहे आणि त्याच्या अगदी वर एसी बसवण्यात आला आहे. ग्राहकांसाठी एसी सुरु करण्याबाबत यात एक अट टाकण्यात आली आहे. महागडं जेवण ऑर्डर केलं तरच एसी सुरु करण्यात येईल अन्यथा बंद राहिल, असं हॉटेल मालकाने स्पष्ट केलं आहे.
या पाटीवर लिहिण्यात आलंय तुम्ही ऑम्लेट, अंडा बुर्जी, अंडा करी किंवा 250 ग्रॅमपर्यंतचे चिकन ऑर्डर केल्यास एसीची सुविधा मिळणार नाही. हॉटेल मालकाची ही विचित्र अट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
पाटीवरील भाषेवरुन हे हॉटेल पंजाबमधील असल्याचं कळते. मात्र, हा फोटो नेमका कुठे आणि कोणी काढला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक हॉटेल मालकाच्या या अनोख्या युक्तीची चांगलंच कौतुक करत आहेत.