रामविलास पासवान पंचतत्वात विलीन, दु:खाने चिरंजीव चिराग बेशुद्ध होऊन कोसळले

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि बिहारचे केंद्रीय मंत्री  रामविलास पासवान (RamVilas Paswan) यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Updated: Oct 10, 2020, 08:48 PM IST
रामविलास पासवान पंचतत्वात विलीन, दु:खाने चिरंजीव चिराग बेशुद्ध होऊन कोसळले title=

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि बिहारचे केंद्रीय मंत्री  रामविलास पासवान (RamVilas Paswan) यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी अंत्यसंस्कार केले. रामविलास पासवान केंद्रीय मंत्री होते. पासवान यांचा मतदारसंघ हाजीपूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री नितीश कुमारही यावेळी उपस्थित होते. यावेळी चिराग पासवान (Chirag Paswan) भावनाविवश झाले आणि ते दु:खाने बेशुद्ध होऊन कोसळले.

रामविलास पासवान पंचतत्वात विलीन

अंत्यसंस्कार करता करता चिराग पासवान खाली कोसळले. पाटणाच्या दिघा घाटावर पासवान यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्याआधी पासवान यांच्या पाटण्य़ातील घरापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.‘रामविलास पासवान अमर रहें’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी श्रद्धांजली वाहली. गुरुवारी रामविलास पासवान यांचे निधन झाले. 

रामविलास पासवान यांच्यावर हाजीपुर जवळील दिघा येथील जनार्दन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पासवान यांचा मुलगा आणि खासदार चिराग पासवान यांनी मुखाग्नी दिला. यावेळी अनेक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. 'रामविलास अमर रहे' अशी जयघोष करीत होते. यावेळी पासवान यांची पत्नी रीना पासवानही घाटावर उपस्थित होती.