राजकीय नेत्याच्या घरी वाजले सनईचौघडे, शाही लग्नाचे फोटो व्हायरल

ज्या क्षणाची उत्सुकता होती अखेर तो क्षण आलाच....लग्नाचा फोटो व्हायरल झालाच... पाहा फोटो

Updated: Dec 9, 2021, 05:41 PM IST
राजकीय नेत्याच्या घरी वाजले सनईचौघडे, शाही लग्नाचे फोटो व्हायरल

नवी दिल्ली: विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा असताना लालू प्रसाद याव यांच्या छोट्या मुलाच्या साखरपुड्याची चर्चा होत आहे. तेजस्वी यादवच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या साखरपुड्याचा शाही थाट एवढा मोठा होता की विचारायलाच नको. 

नुसत्या साखरपुड्यावर एवढा खर्च केल्याचं या फोटोमधून दिसत आहे. आरजेडी नेते आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादवने गुरुवारी नव्या टप्प्याची सुरुवात केली आहे. तेजस्वी यादव यांचा आज दिल्लीत साखरपुडा झाला. या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. 

दिल्लीतील मीसा भारतीच्या सैनिक फार्म हाऊसवर तेजस्वी यांच्या साखरपुड्याचा सोहळा झाला. साखरपुडा आणि लग्न सोहळा पार नुकताच पार पडला. तेजस्वी यादव यांच्या साखरपुड्याला आणि लग्नासाठी फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास पाहुणे उपस्थित होते. 

 

पाहुण्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली होती अशी चर्चा आहे. बिहारमधील काही निवडक लोकच या लग्नाला उपस्थित राहू शकतील. तेजस्वी यादव यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव राजश्री आहे. तेजस्वी यांची पत्नी मूळची हरियाणातील रेवाडीची आहे, मात्र कुटुंब सध्या दिल्लीत राहते.

नववधू ख्रिश्चन असल्याची माहिती मिळाली. तेजस्वी आणि राजश्री लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. तेजस्वी यादव यांनी लग्न केलं. त्यांच्या साखरपुड्याचे आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.