पाटणा : संपूर्ण देशभरात भाजपची लाट पहायला मिळत आहे. मात्र, आता याच भाजप विरोधात विरोधक एकत्र आले असून त्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं आहे.
बिहारची राजधानी पाटणामधील गांधी मैदानात राष्ट्रीय जनता दलाने 'बीजेपी भगाओ, देश बचाओ' रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी शक्तीप्रदर्शन केलं.
आरजेडीने आयोजित केलेल्या या रॅलीत विरोधी पक्षांचे अनेक नेते एकत्र व्यासपीठावर आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, जेडीयुचे शरद यादव यांनी या रॅलीत सहभाग घेतला.
या रॅलीत लाखोंच्या संख्येत आरजेडी समर्थकांनी उपस्थिती लावल्याचं पहायला मिळालं.
#WATCH: Visuals from RJD's 'BJP bhagao, Desh bachao' rally in Patna today. pic.twitter.com/HWRmGvWdu6
— ANI (@ANI) August 27, 2017
या रॅलीत विरोधी पक्षातील जवळपास 16 पक्षांनी सहभाग घेतला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमुल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या पक्षांचा समावेश आहे.
Bihar: Congress's Ghulam Nabi Azad at RJD's rally in Patna. pic.twitter.com/ju3MHcgn1P
— ANI (@ANI) August 27, 2017
सोनिया गांधी स्वत: रॅलीला उपस्थित राहिल्या नाहीत, पण त्यांचा ध्वनिमुद्रित संदेश ऐकवण्यात आला. रॅलीत भाषण करताना उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.