सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' मृत्यूशी संबध नाही'

Salman Khan House Firing Case: आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 10, 2024, 03:25 PM IST
सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' मृत्यूशी संबध नाही' title=
High Court On Salman Khan Case

Salman Khan House Firing Case: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर फायरिंगच्या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली होती.  या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतलं. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पण आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला होता. यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. 

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

अनुज थापन असे या आरोपीचे नाव असून त्याने सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग केली होती. तो कोठडीत शिक्षा भोगत होता. दरम्यान त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. 

यानंतर अनुज थापन याच्या आईने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात तिने सलमान खानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. दरम्यान अनुजच्या आईने दाखल केलेल्या याचिकेतून सलमानचं नाव वगळण्यात यावेत असे आदेश हायकोर्टने दिले आहेत. 

घटनेतील आरोपीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेतील आईनं सलमान खानलाही प्रतिवादी बनवलं होतं.

अनुज थापन याने लॉकअपमध्येच गळफास लावून आत्महत्या केली होती .थापनच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयात  याचिका दाखल केली होती.