SBI ची जबरदस्त स्किम | फक्त 25 हजाराचे झाले 16 लाख; 500 रुपयांपासूनही SIP सुरू

 देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI द्वारा संचलित SBI Mutul Fund च्या काही स्किम्स देशातील सर्वात जुन्या स्किम्सपैकी एक आहेत

Updated: Sep 9, 2021, 03:20 PM IST
SBI ची जबरदस्त स्किम | फक्त 25 हजाराचे झाले 16 लाख; 500 रुपयांपासूनही SIP सुरू title=

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI द्वारा संचलित SBI Mutul Fund च्या काही स्किम्स देशातील सर्वात जुन्या स्किम्सपैकी एक आहेत. त्यातील एक फंड म्हणजेच SBI Large and Midcap Fund हा फंड 1993 साली लॉंच झाला होता. देशातील सर्वात जून्या 9 म्युच्युअल फंडच्या स्किमपैकी ही एक आहे. या फंडने लॉंच नंतर गुंतवणूकदारांना 14.88 टक्क्यांच्या CAGR च्या हिशोबाने परतावा दिला आहे. दीर्घ अवधीसाठी पैसे गुंतवणारे श्रीमंत झाले आहेत.  हा फंड गुंतवणूकदारांचा पैसा फक्त लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये लावला जातो.

लॉंच नंतर रिटर्न
SBI Large and Midcap Fund 28 फेब्रुवारी 1993 ला लॉंच झाला होता. या फंडने 14.88 टक्क्यांचा परतावा दिला आहे.  परताव्याचा विचार केल्यास लॉंच झाल्यावेळी गुंतवणूकदाराने 25 हजार रुपये गुंतवले असते तर,  त्याची व्हॅल्यू आज 16 लाख रुपयांच्या आसपास असती.

SIP गुंतवणूकदारांचीही चांदी
जर 20 वर्षाच्या दरम्यान एखाद्या गुंतवणूकदाराची 2500 रुपयांची मासिक एसआयपी असेल तर त्याची व्हॅल्यू आज 60 लाखांच्या बरोबर आहे.  

SBI Large & Midcap Fund मध्ये कमीत कमी 500 रुपयांची एसआयपी सुरू करता येते. एकत्र गुंतवणूकीसाठी किमान 5000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. 31 जुलै 2021 पर्यंत फंडचा एकूण एसेट्स 4543 कोटी रुपये होते. तर रेशो 2.11 टक्के होता.

या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा पैसा HDFC Bank, Page Industries Textiles, ICICI Bank, SBI, Infosys, Relaxo Footwears, Kirloskar Oil Engines Automobile आणि Bharat Forge सारख्या क्वॉलिटी शेअर्समध्ये गुंतवला जातो.