नवी दिल्ली : देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. प्रत्येक राज्यानं 30 ऑक्टोबरपर्यंत काय नियमावली केली याची माहिती देण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
तसंच देशातील कोणत्याही शाळेत मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ देऊ नका अशा सूचनाही न्यालयानं दिल्या आहे. गुरूग्राममधल्या शाळेत प्रद्युम्न ठाकूर याची हत्या करण्यात आली होता. त्यासंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत.
गेल्या महिन्यात ८ सप्टेंबरला गुरुग्रामस्थित भोंडसी परिसरात रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात सात वर्षाच्या प्रद्युम्नचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. प्रद्युम्नची गळा चिरुन निर्घुणपणे हत्या केली होती. यानंतर प्रद्युम्नचे वडील वरुण चंद्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले.