एक महिन्याच्या बालकांसाठी येणार कोरोना लस

 बाळाचा जन्म झाल्यानंतर एका महिन्याच्या आता ही लस द्यावी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केरळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

Updated: Jan 31, 2021, 07:34 PM IST
एक महिन्याच्या बालकांसाठी येणार कोरोना लस title=

नवी दिल्ली: कोरोनाची लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. आता सर्वसामान्यांपर्यंत कधी पोहोचणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांना ही लस दिली जात आहे. ही लस तरुण आणि लहान मुलांपर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न आहे. तर लवकरच लहान मुलांसाठी खास लस तयार केली जाणार आहे.

सीरम संस्थेच्या EXIM ग्रूप डायरेक्टर पीसी नांबियार यांनी एका इंग्रजी वृत्तापत्राला याबाबत माहिती दिली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत लहान मुलांसाठी सीरम संस्था लस तयार करणार आहे. ऑक्टोबरपर्यंत ही लस तयार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लस विशिष्ट कालावधितच देता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाळाचा जन्म झाल्यानंतर एका महिन्याच्या आता ही लस द्यावी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केरळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. या बालकांसाठी विशिष्ट पद्धतीनं लस विकसित केली जाणार आहे. सध्या कोरोना झाल्यानंतर किंवा त्याचा संसर्ग रोखण्यासाठी ही लस नागरिकांना दिली जात आहे. मात्र लहान मुलांना ही लस जन्मानंतर काही दिवसांतच द्यावी लागणार आहे.

याशिवाय सीरम संस्था या वर्षाअखेरपर्यंत आणखीन 4 लसींवर काम करणार आहे. ज्या लसी वर्षाअखेरपर्यंत बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतील यासाठी सीरम संस्थेचं नियोजन सुरू आहे. 

लहान मुलांसाठी कोरोनाची लस ही ऑक्टोबरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचं परिक्षण करण्यात येईल. कोव्हिशील्ड लसीचे 20 एप्रिलपर्यंत 20 कोटी डोस पूर्ण होणार आहेत. जे केंद्र सरकारच्या आदेशानंतर उपलब्ध होऊ शकतील.