आरडाओरड, किंकाळ्या अन् पळापळ; गँगस्टर टिल्लू ताजपुरियाच्या हत्येचं CCTV फुटेज समोर

Delhi Crime News: तिहार जेल मध्ये सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरियाच्या (Tillu Tajpuria Murder) हत्येचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 4, 2023, 09:06 PM IST
आरडाओरड, किंकाळ्या अन् पळापळ; गँगस्टर टिल्लू ताजपुरियाच्या हत्येचं CCTV फुटेज समोर title=
Tillu Tajpuria Murder CCTV footage

Tillu Tajpuria Murder: दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या (Delhi Crime News) तिहार कारागृहात गँगस्टर टिल्लू ताजपुरिया (Tillu Tajpuria) याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तुरुंगात झालेल्या टोळीयुद्धात (Gangwar) त्याच्यावर लोखंडी सरळीई जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. याच हत्येचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) आता समोर आलं आहे.

तिहार जेल मध्ये सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरियाच्या (Tillu Tajpuria Murder) हत्येचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 4 कैद्यांनी लोखंडी ग्रील तोडून त्यापासून धारदार शस्त्र बनवून टिल्लू ताजपुरियावर हल्ला केला. त्यात टिल्लूचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ (CCTV Footage) पाहून अनेकांच्या अंगावर काटा आलाय. जितेंद्र गोगी टोळी यामागे असल्याचं कळतंय.

आणखी वाचा - Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये 'दंगल', नेमकं काय घडलं? पाहा...

2 मे रोजी सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगातून घडल्याची माहिती पश्चिम विभागाचे अतिरिक्त डीसीपी (Additional DCP) यांनी दिली होती. डीडीयू रुग्णालयात आणलेल्या दोन अंडरट्रायल कैद्यांपैकी एक सुनील उर्फ​टिल्लू हा बेशुद्धा अवस्थेत रुग्णालयात पोहचला होता. मात्र, त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. तर दूसरा जखमी कैदी रोहित याच्यावर उपचार सुरू आहेत. गोगी टोळीतील रियाज, राजेश, योगेश टुंडा व दीपक तीतर नावाच्या गुंडांनी ही हत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

पाहा Video - 

दरम्यान, गोगी, काला जठेडी आणि लॉरेन्स बिष्णोई हे तिन्ही गँग एकत्र काम करतात, त्यामुळे आता हे प्रकरण हायप्रोफाईल बनलंय. सध्या दीपक बॉक्सर हा गोगी गँगचं नेतृत्व करतोय, त्यामुळे आता पोलीस देखील अॅक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळंतय. देशातील उच्च सुरक्षा तुरुंगात अशी घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं दिसून येत आहे.