shocking News: हे कसं काय शक्य आहे? कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुनही महिला गरोदर राहिली

या महिलेने तीन मुलं झाल्यानंतर नसबंदी ऑपरेशन केले. मात्र, नसबंदी ऑपरेशन केल्यानंतर वर्षभरातच पुन्हा गरोदर राहिल्याचा दावा महिलेने केला आहे.

Updated: Dec 21, 2022, 08:47 PM IST
shocking News: हे कसं काय शक्य आहे? कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुनही महिला गरोदर राहिली title=

shocking News : लोकसंख्या नियंत्रणात(Population control) आणण्यासाठी सरकारतर्फे नसबंदी करण्याचा सल्ला दिला जातो. तर, आता नागरिकही जागृत झाले असून अनेक जोडपी दोन मुल झाल्यानंतर मुल बंद होण्यासाठी कुंटुब नियोजन अर्थात  नसबंदी शस्त्रक्रिया(Family planning surgery) करुन घेतात. मात्र, नसबंदी ऑपरेशन केल्यानंतर  वर्षाभरातच एक महिला गरोदर राहिली आहे. मध्य प्रदेशात(Madhya Pradesh) ही धक्कादायक घटना(shocking News) घडली.  बाळाचा जन्म झाल्यानंतर ही महिला थेट बाळाला घेऊन थेट जिल्ह्याधिकारी कार्यालायात पोहचली. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे राहणाऱ्या महिलेसह हा प्रकार घडला आहे. या महिलेने तीन मुलं झाल्यानंतर नसबंदी ऑपरेशन केले. मात्र, नसबंदी ऑपरेशन केल्यानंतर वर्षभरातच पुन्हा गरोदर राहिल्याचा दावा महिलेने केला आहे.

चौथ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर ही महिला बाळाला घेऊन थेट जिल्ह्याधिकारी कार्यालयात पोहचली. डॉक्टरांनी नसबंदी ऑपरेशन चुकीच्या पद्धीतीने केले. हे नसबंदी ऑपरेशन पूर्णपणे फेल गेल्याने आपण गरोदर राहिल्याचा आरोप या महिलेने केला आहे. 
आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आधीच तीन मुलं असल्याने आता चौथ्या मुलाचा सांभाळ करु शकत नाही. नसबंदी ऑपरेशन करुनही चौथे मुल जन्माला आले. चुकीच्या नसबंदी ऑपरेशनमुळे हे झाले असून याला संबधीत डॉक्टर जबाबदार असल्याचा दावा या महिलेने केला आहे. नुकसान भरपाई म्हणून सरकारने मुलाच्या संगोपनाचा खर्चा द्यावा अशी मागणी या महिलेने केली आहे. 

2021 मध्ये या महिलेने शिवपुरीच्या जिल्हा रुग्णालयात नसबंदी ऑपरेशन केले होते. मात्र, नसबंदी ऑपरेशननंतर वर्षाच्या आतच पुन्हा दिवस गेले. तिने जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अशस्वी झाल्यास सरकारकडून 30 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, याबाबत 90 दिवसांच्या आत संबधीत विभागाला कळवावे लागते. मात्र, या महिलेने थेट मुल झाल्यानंतर याबाबत माहिती दिली. यामुळे या महिलेचे नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवण्यात आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ रोहित भदकारिया यांनी दिली.