उत्तर प्रदेश : मुझफ्फरनगरमध्ये ट्रेनला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात ट्रेनचे सहा डबे रुळावरुन घसरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारवरुन पुरी दरम्यान चालणारी कलिंग उत्कल एक्सप्रेसला हा अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या खतौली जवळ ही दुर्घटना घडली आहे.
या अपघातामध्ये २३ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ४०हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Uttar Pradesh: Six coaches of Puri-Haridwar-Kalinga Utkal Express derail in Muzaffarnagar's Khatauli pic.twitter.com/KBxd9NytBf
— ANI UP (@ANINewsUP) August 19, 2017
#WATCH: Visuals from the train derailment site in Muzaffarnagar's Khatauli; 6 coaches have derailed. More details awaited #UttarPradesh pic.twitter.com/AiNdfKV7oS
— ANI UP (@ANINewsUP) August 19, 2017
शनिवारी सायंकाळी पाच वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले असून एनडीआरएफची टीमही दाखल झाली आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश एटीएसचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. हा अपघात होता की घातपात याची तपासणी ही टीम करणार आहे. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.