Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स...वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार

Cooking Tips : हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही, अश्या भन्नाट किचन टिप्स तुम्हाला स्मार्ट गृहिणी बनवतील सोबत तुमचा खुपसा वेळसुद्धा वाचणार आहे. 

Updated: Feb 26, 2023, 06:24 PM IST
Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स...वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार  title=

Kitchen Tips:  ऑफिस आणि घर सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी काही सोप्या टिप्स तुम्हाला स्वयंपाकघरात मदत करू शकतात. त्याने तुमचा वेळही वाचेल आणि किचनमधील कामं सोप्पी होऊन जातील. 
या टिप्स अगदी सोप्या आहेत काही तर आपल्याला माहीतही असतील पण आपण ते वापरायला विसरतो. चला तर मग असाच काही भन्नाट आयडियाची कल्पना जाणून घेऊया आणि बनवूया स्मार्स्यं. 
(smart cooking tips kitchen hacks make food delecious mess free smart kitchen tricks)

टोमॅटो प्युरी (tomato puree) प्रत्येक जेवणासाठी वापरतात पण तुम्हाला टोमॅटोचा पल्प (tomato pulp) काढण्याची एक सोपी पद्धत माहित आहे का नसेल माहित तर हे घ्या... 

1- टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कूकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या, अश्याने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर  सूप ,भाजीसाठीची ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. 
 
2- बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाक मुरडली जातात,  तर अशावेळी या पोळ्या कुकरमध्ये 1- 2  शिटी देऊन घ्या. यानंतर तव्यावर हलक्या शेकून घ्या .  फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील. 

3-  बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊनजातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि  तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील. 

4- नारळ फोडण हे बऱ्याच मुश्किल कामांपैकी एक आहे,  यासाठी एकच करायचं आहे नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे, नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे.

5-  क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी  (crispi puri hacks) पुरीसाठी कणिक मळताना  त्यात २ चमचे गरम केलेलं तेल घाला. 

6-  कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी  मिश्रण बनवताना त्यात मक्याचं पीठ घाला

7 - इडली मऊ बनवण्यासाठी (idali making)  इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे अश्याने इडली छान नरम येते. 

8- उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा अश्याने अंड्यांची साल पटकन निघतील. 

9 - चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.

10 - कांदा  कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अश्याने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत.   

11 - भेंडीची भाजी बनवताना १-२ लिंबाचे थेंब घाला अश्याने भेंडीची भाजी चिकट होणार नाही. 

12 -पुरी किंवा भजे तळतांना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषलं जाईल.

या सर्व आहेत भन्नाट आणि अगदी स्मार्ट किचन टिप्स ज्या वापरून तुम्ही बनाल स्मार्ट आणि सर्वात हटके (kitchen tips for mess free smart kitchen hacks)