Upcoming IPO | मार्केटमध्ये कमाईचा डबल धमाका; या आठवड्यात दोन आयपीओ खुले होणार

आयपीओ मार्केटमध्ये येणारा महिना गुंतवणूकदारांसाठी चांगल्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे. 

Updated: Nov 14, 2021, 03:26 PM IST
Upcoming IPO | मार्केटमध्ये कमाईचा डबल धमाका; या आठवड्यात दोन आयपीओ खुले होणार title=

मुंबई :  आयपीओ मार्केटमध्ये येणारा महिना गुंतवणूकदारांसाठी चांगल्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे. Tarsons Products आणि Go Fashion चे आयपीओ मार्केटमध्ये येणार आहे. (IPO Market)

लाइफ सायंस फर्म Tarsons Products चा आयपीओ तीन दिवसांसाठी खुला असणार आहे. या आयपीओमध्ये 15 नोव्हेंबरपासून गुंतवणूकदार सब्सक्राइब करू शकतील. आपीओ साधारण 1024 रुपयांचा असणार आहे.

महिलांचे कपडे बनवणारा ब्रॅंड Go Colour चा Go Fashion आयपीओ 17 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असणार आहे. आयपीओ साधारण 1014 कोटी रुपयांचा असणार आहे. 

नोव्हेंबरमध्ये आले 8 आयपीओ
नोव्हेबरमध्ये आतापर्यंत एकूण 8 कंपन्यांनी आयपीओ लॉंच केले आहेत.

 या आठ कंपन्यांमध्ये One 97 Communication, ऑनलाइन मार्केटप्लेस Nykaa,पीबी फिनटेक, फिनो पेमेंट्स बैंक, लेटेंट व्यू एनालिटिक्स, सैफायर फूड्स इंडिया, एसजेएस एंटरप्राइजेज आणि सिगाची इंडस्ट्रीजचा सामावेश आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत IPOच्या विक्रीमध्ये यावर्षी तेजी नोंदवली गेली आहे 2020 मध्ये 15 कंपन्यांच्या आयपीओमध्ये 26,622  शेअर्सची विक्री झाली होती.