Dodla Dairy ने केली गुंतवणूदारांची चांदी; KIMS च्या शेअरची कशी होती एन्ट्री? वाचा

 डोडला डेअरीच्या शेअरची आज स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. या शेअरची इश्यु प्राइज 428 रुपये होती. हा शेअर NSE वर 648 रुपये आणि BSE वर 634 रुपयांवर पोहचला.

Updated: Jun 28, 2021, 12:33 PM IST
Dodla Dairy ने केली गुंतवणूदारांची चांदी; KIMS च्या शेअरची कशी होती एन्ट्री? वाचा title=
representative image

मुंबई : डोडला डेअरीच्या शेअरची आज स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. या शेअरची इश्यु प्राइज 428 रुपये होती. हा शेअर NSE वर 648 रुपये आणि BSE वर 634 रुपयांवर पोहचला. प्राइज बॅडच्या हिशोबाने या शेअरच्या माध्यमातून आजच गुंतवणूकदारांना 220 रुपयांचा नफा झाला आहे. म्हणजेच इश्यु प्राइजपेक्षा 50 टक्के नफा झाला आहे.

Dodla Dairy लिस्टिंग नंतर शेअरची चाल 
नुकताच डोडला डेअरीचा आयपीओ येऊन गेला होता. त्यानंतर आज हा शेअर स्टॉक मार्केटमध्ये येणार होता. आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर शेअरनेदेखील गुंतवणूकदारांना खुश केले आहे. हा शेअर NSC मध्ये 550 रुपयांवर तर BSE मध्ये 525 रुपयांवर लिस्टिंग झाला होता. BSE मध्ये हा शेअर 634 रुपयांवर पोहचला आहे. NSE वर 648 रुपयांवर गेला होता. 

डोडला डेअरीच्या आयपीओतून 520 कोटी रुपये उभारण्यात आले. किरकोर गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के भाग रिझर्व्ह ठेवण्यात आला होता. कंपनीच्या आयपीओतून मिळालेल्या पैशांचा वापर कर्ज फेडणे तसेच सामान्य गरजांसाठी करण्यात येणार आहे. 

डोडला डेअरी दक्षिण भारतात अन्य खासगी कंपन्यांच्या सह डेअरी उत्पादनं उत्पादित करणारी मोठी कंपनी आहे. शेअर मार्केटमधील दक्षिण भारतातील ही दुसरी सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रात त्यांच्या प्रोडक्टला चांगली मागणी आहे.

KIMS ची लिस्टिंग 

कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स(KIMS)ची लिस्टिंग इश्यु प्राइज 825 रुपयांच्या प्रमाणात BSE वर 1009 रुपयांवर लिस्ट झाला.  इंट्रा डे मध्ये हा शेअर 105 रुपयांनी मजबूत होऊन पुन्हा 967 रुपयांवर ट्रेड करीत होता.