बाप करत होता पेट्रोल पंपावर काम आता मुलगा पेट्रोलियम कंपनीत अधिकारी, पगार ऐकून हैराण व्हाल...

  ग्वालियरमध्ये राहणारे मनोहर मंडेलिया गेल्या १८ वर्षांपासून एका पेट्रोल पंपावर काम करीत आहे. पण त्यांनी आपल्या मुलाला खूप शिकवलं, त्याला IIM शिलाँगमध्ये शिक्षण दिले. आता कर्मधर्म संयोगाने त्यांचा मुलगा मोहित पेट्रोलियम कंपनीतील ऑफिसर बनला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 23, 2018, 07:48 PM IST
 बाप करत होता पेट्रोल पंपावर काम आता मुलगा पेट्रोलियम कंपनीत अधिकारी, पगार ऐकून हैराण व्हाल...  title=

ग्वालियर :  ग्वालियरमध्ये राहणारे मनोहर मंडेलिया गेल्या १८ वर्षांपासून एका पेट्रोल पंपावर काम करीत आहे. पण त्यांनी आपल्या मुलाला खूप शिकवलं, त्याला IIM शिलाँगमध्ये शिक्षण दिले. आता कर्मधर्म संयोगाने त्यांचा मुलगा मोहित पेट्रोलियम कंपनीतील ऑफिसर बनला आहे. 

ऑफीसर झालेल्या मोहित मंडेलिया याला वर्षाला २१.४ लाखांचा रग्गड पगार मिळाला आहे. मोहितने सांगितले की माझ्या वडिलांना जीवनात खूप काही करायचे होते पण आर्थिक परिस्थितीमुळे ते काहीच करू शकले नाही. त्यांनी बी.कॉम करूनही पेट्रोल पंपावर नोकरी केली. 

माझ्या वडिलांचा संघर्ष पाहून मी खूप अभ्यास केला आणि शाळेपासून आयआयएमचे शिक्षण स्कॉरलशीपवर केले. 

आता शिलाँगमध्ये कॅम्पस सिलेक्शनमध्ये एक पेट्रोलियमम कंपनीत सेल्स ऑफीसर म्हणून मोहितचे सिलेक्शन झाले आहे.