सिझेरियन डिलिव्हरी : कारवाईसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली

शस्त्रक्रिया म्हणजेच सिझेरियन डिलिव्हरी करुन बाळंतपण करणाऱ्या खासगी रुग्णालयाविरोधात कारवाई करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.सिझेरियन डिलिव्हरीसंदर्भात न्यायालयानं निर्देश द्यावेत अशी तुमची इच्छा आहे का असा सवाल न्यायालयानं याचिकाकर्त्याला केला.

Updated: Aug 3, 2018, 11:22 PM IST
सिझेरियन डिलिव्हरी : कारवाईसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली  title=

नवी दिल्ली : शस्त्रक्रिया म्हणजेच सिझेरियन डिलिव्हरी करुन बाळंतपण करणाऱ्या खासगी रुग्णालयाविरोधात कारवाई करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.सिझेरियन डिलिव्हरीसंदर्भात न्यायालयानं निर्देश द्यावेत अशी तुमची इच्छा आहे का असा सवाल न्यायालयानं याचिकाकर्त्याला केला.

खासगी रुग्णालयात सिझेरियन करुन पैसे कमावेल जात असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकरानं नियमावली तयार करावी यासंदर्भात याचिकाकर्त्यानं सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती. न्यायालयाचा वेळ खाल्ला आणि दुरुपयोग केल्याचा ठपका न्यायालयानं याचिकाकर्त्यावर ठेवला. याचबरोबर याचिकाकर्त्याला २५ हजारांचा दंडही ठोठावला.