Tata Group To Acquire Bisleri : टाटा नमक (Tata salt) हे प्रसिद्ध आहेत. पण आता टाटा पाणी कसं वाटतं...पण लवकरच मार्केटमध्ये तुम्हाला टाटाचं पाणी मिळणार आहे. बॉटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड बिसरेली (Bisleri) आता टाटा समुहाकडे (Tata Group) आला आहे. टाटा कन्झ्युमर कंपनीने बिसलेरी ब्रँड विकत घेतला.
रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांच्या अध्यक्षतेखाली हा ब्रँड भारतात चांगलाच फोफावला. त्यानंतर टाटांनी तब्बल 7 हजार कोटींना हा ब्रँड विकत घेतला. पुढील दोन वर्षे बिसलेरीचं मॅनेजमेंट विद्यमान कंपनीकडेच राहील त्यानंतर टाटा कन्झ्युमर हे व्यवस्थापन ताब्यात घेईल. याआधी सुमारे 30 वर्षांपूर्वी रमेश चौहान यांनी थम्प्स अप (Thumps up), गोल्ड स्पॉट (Gold spot), लिमका (Limca) हे कोल्ड ड्रिंक्सचे ब्रँड (cold drinks Brands)कोकाकोला (coca cola) या अमेरिकन कंपनीला विकले होते.
बिसलेरी विकत घेण्यासाठी रिलायन्स रिटेल (Reliance Retail), नेसले या कंपन्याही शर्यतीत होत्या पण टाटांनी बाजी मारली. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
हेही वाचा - Mukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?
बाटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड म्हणून ओळखली जाणारी बिस्लेरीची सुरुवात फार्मास्युटिकल कंपनी म्हणून झाली होती. या कंपनीचे संस्थापक इटालियन व्यापारी फेलिस बिस्लेरी पहिले मलेरियाची औषध विकायचे. फेलिस बिस्लेरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टर रॉसी यांनी बिस्लेरीला पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. भारतात डॉ. रॉसी यांनी वकील खुशरू संतकू यांच्या सहकार्याने बिस्लेरी सुरू केली. 1969 मध्ये, बिसलेरी वॉटर प्लांट सुरू झाल्यानंतर अवघ्या 4 वर्षांनी रमेश चौहान यांनी बिसलेरी अवघ्या 4 लाख रुपयांना विकत घेतली. तेव्हापासून या कंपनीची मालकी रमेश चौहान यांच्याकडे आहे. रमेश चौहान 82 वर्षांचे झाले आहेत. त्यांची मुलगी जयंतीला (Jayanti) या व्यवसायात रस नाही. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेता.