बर्निंग कारचा थरार पाहून पर्यटकांची उडाली झोप, पाहा व्हिडीओ

भीषण बर्निंग कारचा थरार पाहून पर्यटकांचीही झोप उडाली.

Updated: Dec 4, 2021, 06:46 PM IST
बर्निंग कारचा थरार पाहून पर्यटकांची उडाली झोप, पाहा व्हिडीओ

शिमला: फिरायला जाताना आपण कार घेऊन जातो किंवा एखादी कार बुक करतो. काधी कधी वेळ चांगली नसली की दुर्घटना होतात. तर काही वेळा दुर्घटना होण्याचे संकेत मिळत असतात. असेच संकेत शिमल्यामध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना मिळाले. या पर्यटकांनी वेळीच भान राखून आपला जीव वाचवला नाहीतर दुर्घटना निश्चित होती. 

पर्यटकांनी बुक केलेल्या कारमधून अचानक धूर येऊ लागला. पाचही पर्यटक तातडीनं गाडीतून बाहेर आले. तेवढ्यात गाडीनं पेट घेतला. संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी होती. दैव बलवत्तर म्हणून या पर्यटकांचा जीव वाचला होता. या गाडीतून भीषण स्फोटाचा आवजही आला. 

भीषण बर्निंग कारचा थरार पाहून पर्यटकांचीही झोप उडाली. या गाडीमध्ये पाच पर्यटक बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र हे पर्यटक सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. 

या बर्निंग कारचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शिमला इथे 103 टनलजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे. यामधून प्रवास करणारे पर्यटक उत्तर प्रदेशहून शिमला इथे फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली.