'द ग्रेट खली'समोर घेत होता सेल्फी, खलीला आला राग, मग झालं असं काही...

खलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Updated: Oct 11, 2021, 09:20 PM IST
'द ग्रेट खली'समोर घेत होता सेल्फी, खलीला आला राग, मग झालं असं काही... title=

मुंबई : दलिपसिंग राणा उर्फ ‘द ग्रेट खली’ (The Great Khali) सध्या WWE मध्ये दिसत नसला तरी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. खलीने डब्लूडब्लूईमध्ये (WWE)पदार्पणातच डेड मॅन अर्थात अंडरटेकरला (Undertaker) मात दिली आणि खली हे नाव चर्चेत आलं. अंडरटेकरशिवाय खलीने केन, बिग शॉ, जॉन सीना आणि शॉन मायकल्स अशा अनेक डब्ल्यूडब्ल्यूई स्टार्सना धुळ चारली आहे. 

खलीने नुकताच एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खली जिममध्ये वर्कआऊट करत असताना एक व्यक्ती खलीला न विचारता त्याच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. यामुळ संतापलेल्या खलीने या व्यक्तीला जोरदार थप्पड लगावल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. खलीच्या एका थपडेनच हा व्यक्ती अशरक्ष: खाली कोसळतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Great Khali (@thegreatkhali)

हा व्हिडिओ खलीने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. 

WWE मध्ये आपलं कारकिर्द करण्यापूर्वी खली पंजाब पोलीसमध्ये अधिकारी पदावर होता. खलीने चार हॉलिवूड आणि दोन बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.