या राज्याच्या सरकारने पेट्रोलच्या किंमतीत केली कपात; वाढत्या किंमतींना केंद्राला ठरवले जबाबदार

या राज्यात पेट्रोलवर 3 रुपये प्रति लीटर कर कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींना केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका देखील केली आहे

Updated: Aug 14, 2021, 03:43 PM IST
या राज्याच्या सरकारने पेट्रोलच्या किंमतीत केली कपात; वाढत्या किंमतींना केंद्राला ठरवले जबाबदार  title=

चेन्नई : तामिळनाडू सरकारने राज्यात पेट्रोलवर 3 रुपये प्रति लीटर कर कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींना केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका देखील केली आहे. तामिळनाडूचे अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजनने विधानसभेत बजट मांडतांना म्हटले की, राज्याने पेट्रोलवरील करावर 3 रुपये प्रति लीटर कपातीचा निर्णय घेतला आहे. 

त्यागराजन यांनी म्हटले की, सरकारने पेट्रोलवरील टॅक्स प्रभावी दर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लोकांना दिलासा मिळणार आहे. सरकारचा वर्षाला 1160 कोटींचे महसूली तोटा होणार आहे. मे 2014 मध्ये पेट्रोलवरील एकूण टॅक्स 10.39 रुपये प्रति लीटर वरून वाढवून 32.90 रुपये प्रतिलीटर करण्यात आला आहे.  

निवडणूक आश्वासन
अर्थमंत्री  त्यागराजन यांनी म्हटले की, तामिळनाडुमध्ये 2.63 कोटी टु व्हिलर आहेत. सर्वसामान्यांसाठी हे लोकप्रिय आणि कामाचे साधन आहे. त्यांना पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे आर्थिक फटका बसत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

द्रमुकने विधानसभा निवडणूकांदरम्यान त्यांची सरकार स्थापन झाल्यास पेट्रोल 5 रुपये आणि डिछेल चार रुपये प्रति लीटर कपात करण्याचे आश्वासन दिले होते.