नवी दिल्ली : देशभरातील मुस्लिम बांधव बकरी ईदचा पवित्र सण साजरा करीत आहेत. ईदनिमित्त एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या जातात पण अशी गळाभेट न घेण्याचे फर्मान देण्यात आले आहे. पर्सनल लॉ बोर्डचे मेंम्बर आणि माशूर सुन्नी मौलाना खालिद रशीद फिरंगिमहलींनी हे फर्मान दिले आहे.
यावर्षी नमाज अदा केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेऊ नका असे यात म्हटले आहे. बकरी ईदनिमित्त नमाजानंतर गळाभेट न घेता एकमेकांना शुभेच्छा द्या असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्सनल लॉ बोर्डचे मेंम्बर आणि माशूर सुन्नी मौलाना खालिद रशीद फिरंगिमहलीं यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. उत्तर प्रदेशमधील २० टक्के जनता मुस्लिम आहे. ईद दरम्यान मुस्लिम बांधव नमाज झाल्यावर एकमेकांची गळाभेट घेतात. हात मिळवणे आणि गळाभेट घेतल्याने स्वाइन फ्ल्यूचे इन्फेक्शनची भिती असते. म्हणून ही काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देवाला सर्वांच भल आणि सुरक्षा हवी आहे. कोणत्याही सणातून स्वाईन फ्ल्यू चा फैलाव होत असेल तर ती निंदनीय बाब असेल असे ते म्हणाले.