या चिमुकलीहून सुंदर 'राष्ट्रगीत' कुणीच गायलं नसेल (व्हिडिओ)

नुकताच देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 17, 2017, 05:08 PM IST
या चिमुकलीहून सुंदर 'राष्ट्रगीत' कुणीच गायलं नसेल (व्हिडिओ) title=

मुंबई : नुकताच देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. 

शाळेपासून सगळीकडेच झेंडावंदन साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येकाने अगदी मनोभावे राष्ट्रगीत म्हटले आणि आपल्या देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पण एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत एक चिमुकली आपल्या बोबड्या बोलांनी हे राष्ट्रगीत म्हणतं आहे. या व्हिडिओला सध्या अधिक पसंती मिळत आहे. स्वातंत्र्य दिन साजरा होऊन दोन दिवस होत आले असले तरीही या व्हिडिओला मिळणारे हिट्स कौतुकास्पद आहेत. हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

फेसबुकवर हा व्हिडिओ पाखी रॉय या व्यक्तीने शेअर केला असून या व्हिडिओला आतापर्यंत ४२ हजाराहून अधिक लाईक्स आहेत. या व्हिडिओतील चिमुकली नेमकी कोण आहे? तिचं वय काय? याबजद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भलताच पसंतीला पडला आहे.